InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला केली मारहाण

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम विषयी वक्तव्य केले होते. या संबधित बातमीच्या पोस्टवर कमेंटमध्ये सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

अक्षय तांबवेकर असे तरूणाचे नाव असून, तो कोल्हापूरचा आहे. अक्षयने फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आणि त्याला चोप दिला. कार्यकर्त्यांनी अक्षयला कॅमेऱ्यासमोर माफी मागण्यास सांगितली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.