InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरांवर गुन्हा दाखल

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काही दिवसांपूर्वी देवरांनी आपल्या प्रचारात शिवसेने विरोधात धर्माचा आधार घेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देवरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 देवरा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेने जैन धर्मियांच्या पर्युषण काळात त्यांच्या मंदिराबाहेर मांस शिजविले होते. त्यामुळे शिवसेनेला धडा शिकवला पाहिजे, असे सांगत भडकाऊ भाषण केले होते. याबाबत सनी जैन आणि धर्मेंद्र मिश्रा या उच्च न्यायालयातील वकिलांनी आचारसंहिता पथकाकडे तक्रार केली होती.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.