सत्ताधारी आमदारांचा गोंधळ, राज्यपालांनी दोन मिनिटांत अभिभाषण गुंडाळले!

मुंबई : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झालीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केली तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचा निषेध केला. “शिवाजी महाराज की’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तीन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.

त्यामुळे त्यांचा निषेध आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आला. राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती केली. राष्ट्रगीतानंतर त्यांनी अभिभाषणास सुरवात केली. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. कोश्यारी यांनी दोन वाक्य पूर्ण करुन आपले भाषण संपवलं. ते फाईल बंद करुन राजभवनाच्या दिशेला निघून गेले.

अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आवरत पटलावर ठेवले. त्यामुळे सभागृहातील उपस्थित अचंबित झाले. सत्ताधारी पक्षाने ‘राज्यपाल हटाव’ अशा घोषणा यावेळी दिल्या. त्यामुळे आजच्या या घडामोडीमुळे आगामी काळात सत्ताधारी विरुद्ध राज्यपाल संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या