बीएसएनएल ग्राहकांसाठी ‘अभिनंदन १५१’ प्लान

सरकारी कंपनी बीएसएनएलने मागील काही काळात आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बरेच बदल केले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बीएसएनएलकडून जुन्या प्लानमध्ये बदल करून अपडेट करण्यात येत आहे. त्यानुसार, बीएसएनएलने आता ‘अभिनंदन-१५१’ नावाने नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे.

बीएसएनएलच्या ‘अभिनंदन १५१’ या प्लानमध्ये दररोज १ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येत आहे. प्लानमध्ये १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग आहे. रोमिंग कॉलचा फायदा मुंबई आणि दिल्ली सर्कलमध्ये होणार आहे. प्लानमध्ये मिळणारे फ्री बेनिफिट २४ दिवसांपर्यंत वैध असणार आहे. त्याशिवाय प्लानची वैधता १८० दिवस असणार आहे. बीएसएनएलचा हा प्लान ९० दिवसांसाठी बाजारात उपलब्ध असणार असून १० सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.