Congress | महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेनेत सावरकरांवरुन मतभेद! काँग्रेसने दिलं स्पष्टीकरण

Congress | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरु आहे. यादरम्यान, त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी मध्ये देखील या कारणामुळे फुट पडण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस (Congress) नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुलजी गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच, सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिद्धात सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य असल्याचं जयराम रमेश म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.