Congress | “… म्हणून आमच्या घरावर छापे टाकले जाताहेत”, काँग्रेस आमदाराचा आरोप

Congress | नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांच्या फाईल्स दाखवून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या. तर शिवसेना पक्षाचे बडे नेते संजय राऊत देखील याला बळी पडून सध्या तुरुंगात आहेत. अशातच झारखंड मधील रांची येथील काँग्रेस (Congress) आमदार कुमार जयमंगल सिंह (Kumar Jaimangal Singh) यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापे (Income Tax Raid) टाकण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त जयमंगल सिंह यांनी भाजप (BJP) पक्षावर घणाघात केला आहे.

आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, त्यामुळं इथं छापे टाकले जात आहेत. माझ्याकडं एक कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती एकाही प्राप्तिकर अधिकाऱ्यानं दिलेली नाही. माझ्या नातेवाईकांनाही त्रास दिला जात आहे. भाजपचे बाबुलाल मरांडी, निशिकांत दुबे, एचबी सरमा यांच्या सांगण्यावरून आमच्या घरावर छापेमारी केली जात आहे, असं जयमंगल सिंह म्हणाले आहे.

दरम्यान, माझ्या पाटण्यातील घरातून त्यांना काही कागदपत्रं आणि 600 रुपये मिळाले आहेत. मात्र, रांचीतील घराबद्दल अद्याप काहीही माहिती नाही. ते अधिकारी इथंच बसून आहेत आणि आम्हाला जबरदस्तीनं घरात कोंडून ठेवत आहेत, असा संतापल जयमंगल सिंह यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.