Congress | “शिंदे-बोम्मईंना एकाच खोलीत बंद करा, कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा अजब सल्ला

Congress | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. अशातच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithwiraj Chavan) यांनी अजब उपाय सांगितला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विशेष बैठक बोलावली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांची या विषय़ी नेमकी काय चर्चा झाली आहे, हे बाहेर आलेले नाही. त्यामुळे सीमाप्रश्न सुटेपर्यंत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकाच खोलीत बंद करा, असा सल्ला काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

ते म्हणाले, ‘ कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. आणि सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या बाजूनं निकाल देईल, अशी भिती कर्नाटक सरकारला आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून भडकाऊ वक्तव्य केले जात आहेत.”

“कर्नाटकला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने बोटचेपी भुमिका घेऊ नये. केंद्रीय गृमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बंद करावं आणि सीमाप्रश्न सुटेपर्यंत बाहेर येऊ नका, असं सांगितलं तर हे थांबेल, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.