Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला.
कॉंग्रेसने सुधीर तांबे यांच्यासह सत्यजीत तांबे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागेलेलं आहे. सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.
“सत्यजित तांबेंच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेऊन लढले नाही. सत्यजित आमचे आहेत आणि आमच्या बरोबर राहतील”, असा विश्वास विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
एकीकडे सत्यजीत तांबे हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचं म्हंटल जातंय तर दुसरीकडे काँग्रेसच्या बड्या नेत्याने हे विधान केलं आहे. “पक्षावर राग नसेल तर त्यांनी पक्षासोबत राहावं. पण पक्षातील पद आणि व्यक्ती बदलत राहातात. त्यांची वैयक्तिक कुणावर नाराजी असेल तर पक्षाला सोडून जाऊ नये”, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.
तसेच झालं गेलं महाभारत विसरून सत्यजित तांबेंना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हाय कमांडला तशी विनंती करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सत्यजीत तांबे भाजपाला पाठिंबा देतात की काँग्रेसमध्ये परत येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Ajit Pawar advice to satyajeet tambe
सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे हे कॉंग्रेसच्या विचारांचे आहे, त्यामुळे सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) हे थोरामोठ्याचे ऐकतील असं वाटतं असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. वरिष्ठांशी सत्यजीतचे चांगलं संबंध आहेत. त्यामुळे काँग्रेसने आणि सत्यजीतने फार ताणून धरू नये, असा सल्लाही त्यांनी सत्यजित तांबे ( Ajit Pawar Advice to Satyajit Tambe) यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | वरळीतून लढवून दाखवण्याचं ठाकरे गटाचं चॅलेंज शिंदे गटाने स्विकारलं; ‘या’ रणरागिणीने उचलला विडा
- Siddharth-Kiara Wedding | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे वऱ्हाड राजस्थानला रवाना
- Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे
- Glowing Skin | सकाळी उठून चमकदार त्वचा बघायची असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Jitendra Awhad | गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा आव्हाडांनी घेतला समाचार