Congress । “पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची सडकून टीका 

Congress । राजस्थान : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारतभर भारत जोडो यात्रा सुरु आहे. आत्ता ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात सुरु आहे. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराला चीनकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भाजपने राहुल यांना जयचंद असे म्हंटले होते. यावर प्रत्युत्तर देत मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपाला सुनावलं आहे.

“भारत-चीन सीमेवरील चिनी घुसखोरी सरकार रोखू शकत नाही. संसदेत चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहेत. पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे काम करतात. आम्ही देशाबरोबर आहोत. मात्र, सरकार माहिती लपवत आहे,” अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

असं बोलतानाच त्यांनी भाजपाला खोचक सवाल केला आहे. “तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्याग केला आहे का?”, असे म्हणत खरगे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.