Congress | “जे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आलं त्यावर का बोललं जातं नाही”; काँग्रेसचा संतप्त सवाल

Congress | मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सत्ताधीशांनी स्वतः पेक्षा जनतेची काळजी करावी कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून फक्त स्वतःचा फायदा न बघता नागरिकांचीही काळजी करावी, असा टोला नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे.

“ज्या प्रकारची स्वप्न भाजपने दाखवली आहेत, त्या बद्दल भाजप आणि त्यांचे काहीच का बोलत नाहीत असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने लोकांना स्वप्न दाखवून आणि लोकांची दिशाभूल करून त्यांनी सत्ता हस्तगत केली आहे. ज्या प्रकारची भाजपने स्वप्न दाखवली होती. त्याबाबत भाजप एका शब्दानही बोलत नाही” असा संतप्त सवाल नाना पटोलेंनी केला आहे.

“आमचे मित्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना आता प्रत्यय आला की, त्यावेळी त्यांना जेलमध्ये टाकणार होते विरोधकांवर टीका करायची म्हणून ते वाटेल ती टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले होते की, मी बदला घेतला”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

शिंदे गट आणि भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या काही नेत्यांच्या सुरक्षितेत कपात केली. पण ते चुकीचे असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या