Congress | 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पदासाठी थेट हायकमांडला पत्र

Congress | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभेचे नवीन विरोधी पक्षनेते कोण असतील? याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पदासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू असल्याचं दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी हायकामांड आणि अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिण्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे पुढील विरोधी पक्षनेता कोण असेल? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला (Congress) आहे.

Congress will get the position of Leader of the Opposition

काँग्रेसकडे (Congress) संख्याबळ जास्त असल्यामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल. या प्रकरणावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण वाढल्याच्या चर्चा होताना दिसत आहे.

अशात भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी हायकमांडला पत्र पाठवलं आहे. त्यांच्याकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधान भवनात आज बैठक बोलावली आहे.

या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43uB2ws