InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांमध्ये फूट

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत असून, यापैकी एक आमदार बुधवारी रात्री पुन्हा बंगळूरला रवाना झाला आहे.

काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार राजीनामा देऊन मुंबईत आश्रयास आहेत. गेल्या तीन दिवसांत नाट्यमय घडामोडींनंतर यापैकी एक आमदार रातोरात बेंगळूरला परतला आहे. या आमदाराने पुन्हा मुंबईला जाणार नसल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे. तसेच अद्याप काँग्रेसचाच असल्याने बेंगळूरमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काँग्रेस नेेत डीके शिवकुमार हे या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी मुंबईला आले होते. मुंबईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये हे आमदार आश्रयाला असून त्यांनी शिवकुमार यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे पत्र मुंबई पोलिस आयुक्तांना देत संरक्षण मागितले होते. यामुळे मुंबई पोलिसांनी हॉटेल परिसरात 144 कलम लागू करत शिवकुमार यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला. सुमारे सहा तास चाललेल्या या नाट्यानंतर शिवकुमार यांना ताब्यात घेत पुन्हा बेंगळुरूला पाठविण्यात आले होते.

या नाट्यानंतर बुधवारी रात्री उशिरा हॉटेलात असलेले काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि बेंगळूरु विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. टी. सोमशेखर यांनी विमान पकडत बेंगळूर गाठले आहे. यासाठी त्यांनी गुरुवारी सकाळी महामंडळाची बैठक असल्याचे कारण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply