30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आणलंय, फार मोठा तीर नाही मारला; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

मुंबई : सध्या संपूर्ण जगाचं लक्ष रशिया युक्रेनच्या युद्धावर केंद्रित झालं आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले जात असून अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. यानंतर पुढे युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन फौजा दाखल झाल्या असून युक्रेनची आता निकराची लढाई सुरू आहे.

किव्ह रस्त्यांवर युक्रेन आणि रशियाच्या सैनियाकांमध्ये लढाई होत आहे. किव्हवर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले होत आहेत. रशियान रणगाड्यांनी किव्हचे रस्ते धडधडत आहेत. दुसरीकडे युक्रेनमधील सर्व सेवा ठप्प झाल्या असून हजारो भारतीय विद्यार्थी तिथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

भारतातले जवळपास ३० हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. 900 विद्यार्थी मायदेशी परतले असले तरी भारतातील 25 ते 30 हजार विद्यार्थी अजूनही यूक्रेनमध्ये अडकले आहेत. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

वडेट्टीवार म्हणाले कि, युक्रेनमध्ये 30 हजार विद्यार्थी अडकले आहेत. 30 हजारांमधून फक्त 900 मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारलेला नाही, अशी खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तर ऑपरेशन गंगा वाहून जाता कामा नये. प्रत्येक विद्यार्थ्याला परत आणावे, असा टोला देखील वडेट्टीवार यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा