चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस गांभीर्याने घेत नाही, नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने आले आहेत. यामध्ये आता काँग्रेसनेही आपली प्रतिक्रिया दिलीय.

दोन दिवसांमध्ये काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. यादरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले आहेत. तसेच नाना पटोलेंनी प्रत्युत्तर देत फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू असं म्हटलं आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांचा इशारा आम्ही गांभीर्याने घेत नाहीत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे ब्लॅकमेलिंग करणारे सरकार आहे. केंद्र सरकार ज्याप्रमाणे माध्यमांना, उद्योगपतींना ब्लॅकमेल केले जाते त्याची प्रतिकृती आता महाराष्ट्रात दिसत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

कर नाही तर डर कशाला अशी महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांवर म्हटलं आहे. आमच्यात दोष नसल्यामुळे आम्हाला आरोपाची भीती नसल्याचे नान पटोले यांनी म्हटलं आहे. भाजप लोकांची दिशाभूल करत असून लोकांची समस्या सोडवत नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या