InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राजस्थानमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला; भाजप गेले कोमात

राजस्थानमधील सत्तापालटाचे सूत्र कायम राहिले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी झाल्या आहेत. तरी मात्र त्यांना आपल्या नेतृत्वात सरकार राखण्यात अपयश आलं आहे. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात राजस्थानात एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, भाजपसह इतर पक्ष कोणातच गेले आहेत.

काँग्रेसचा युवा चेहरा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात पक्षाने राजस्थानात चमकदार कामगिरी बजावली आहे. राजस्थानात सत्तास्थापन करतानाच सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातही विजय मिळवला. गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही.

काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली. राजस्थानने वसुंधरा राजे यांना सपशेल नाकारलं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply