InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मध्य प्रदेश,राजस्थानात काँग्रेस सरकार धोक्यात

कर्नाटक आणि गोव्यात आपले आमदार फुटण्याची परिस्थिती लक्षात घेत काँग्रेस पक्ष आपले इतर बालेकिल्ले वाचवण्याच्या कामी लागली असून मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस हायअलर्ट आहे. खरेतर, मध्य प्रदेश आणि राजस्थानात अतिशय कमी फरकाच्या बहुमताने काँग्रेसची सरकारे आहेत. या राज्यांमध्ये सरकारांचे अस्तित्व काही अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर अवलंबून आहे.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आता मध्य प्रदेशावर नजर रोखून असल्याची कुणकुण काँग्रेसला लागली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि इतर नेते सावध असून केवळ विरोधकांच्या हालचालींवरच नाही, तर आपल्या आमदारांवरही त्यांचे बारिक लक्ष असल्याचे म्हटले जात आहे.

कर्नाटक आणि गोव्यात ज्या प्रकारे आमदारांना फोडले जात आहे, ते पाहता हा प्रकार जुन्या ऑपरेशन लोटसमध्ये वापरण्यात आलेल्या पद्धतीपेक्षाही पुढचा असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply