राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय : नाना पटोले

अहमदनगर : एकावेळी देशात सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून उतरती काळा लागली आहे. काल टिळक भवन येथे अहमदनगर जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षासारख्या पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने ‘सबका साथ’ देणारा पक्ष असल्यानेच काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम काँग्रेसमध्ये केले जाते. असं पटोले म्हणाले.
तसेच, सर्वांच्या विकासाठी झटणारा काँग्रेस पक्ष हाच देशात व राज्यात सक्षम पर्याय आहे, असं नाना पटोले म्हणाले. तसेच यावेळी काॅंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. तेव्हा अहमदनगरमधील अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. याचदरम्यान बाळासाहेब थोरात यांनी देखील विरोधकांवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा घुमजाव
- “सत्ता गेल्यावर कुणाचा तोल जातो तर कुणी भ्रमिष्ट होतं”
- शिवसेनेचे १२ तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपमध्ये येण्याच्या तयारीत; माजी मंत्र्याचा दावा
- दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही; भातखळकरांचा पवारांना टोला
- संजय राऊतांना कमी-जास्त प्रतीचा गांजा कसा असतो ते चांगलं कळतं ! नितेश राणेंचा घणाघात