InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेस, जेडीएसच्याआमदारांकडून गोव्याला जाण्याचा प्लॅन रद्द

कर्नाटकातील राजकीय नाट्य आता अखेरच्या टप्प्यात आलं आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस, जेडीएसच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्यानं कर्नाटकमधील नाट्यावर पडदा पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र बंडखोर आमदार अद्यापही अडून बसले आहेत. आमदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नेते आज गोव्याला जाणार होते. मात्र त्यांनी अचानक ही योजना रद्द केली आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या मुंबईतील अज्ञातस्थळी सर्व बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कर्नाटकातील राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी आली आहे.

भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शनिवारपासून कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य जोरात आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानं सत्ता नाटक सुरू झालं. कर्नाटकात कोणाचं सरकार येणार, हे ठरवू शकणारे हे आमदार सध्या मुंबईत आहेत. ते आज गोव्याला जाणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी ही योजना रद्द करत मुंबईत अज्ञातस्थळी राहण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply