काँग्रेसने शब्द पाळला ; मुंबई महापालिकेत शिवसेना आणि कॉंग्रेसची छुपी आघाडी

काँग्रेसने मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला दिलेला शब्द पाळला. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून स्थायीच्या निवडणुकीतही काँग्रेस माघार घेणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले.

राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून कॉंग्रेसनं आज महापालिकेतील समित्यांच्या पहिल्या समितीच्या- शिक्षण समितीच्या निवडणूकीत अध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज मागे घेतला.

कॉंग्रेसने अर्ज मागे घेतला नसता तर भाजपनं कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे केले असते.

स्थायी समितीत देखील हेच चित्र राहणार आहे. तिथंही काँग्रेस माघार घेणार आहे. मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपा शिवसेनेला मतदान करेल अशी रणनिती आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.