InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आमचा प्रयत्न -अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी वंचित ही भाजपचीच बी टीम असल्याचा आरोप केला. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले.

वंचितच्या भूमिकेबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘मतांचं धृवीकरण होऊ नये असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळेच वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. प्रश्न A टीम किंवा B टीमचा नसून हा प्रकार वेगळाच आहे.’

‘विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. विषय जागांचा नसून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,’ अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply