InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बिगर भाजप सरकार ही काँग्रेसजनांची इच्छा – अशोक चव्हाण

- Advertisement -

राज्यात बिगर भाजप सरकार येणं ही काँग्रेसजनांची इच्छा असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. तसेच यासंदर्भात शिवसेनेने भूमिका घ्यावी असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे. जनतेने कौल काही भाजपच्या बाजूने दिलेला नाही, त्यामुळे भाजपचं सरकार राज्यात येता कामा नये हा प्रमुख निष्कर्ष आहे. यासाठीचे सर्व पर्याय आम्ही चर्चा करुनचं निर्णय घेऊ असंही चव्हाण म्हणाले. पण प्रथम निर्णय शिवसेना काय घेते हा महत्त्वाचा विषय आहे. शेवटी शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतरचं राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल. त्यामुळे बिगर भाजप सरकार येणं हे आमचं प्राधान्य राहणार असल्याचं चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

Loading...

अशोक चव्हाणांच्या विधानाचा धागा पकडत काँग्रेसमधील आमदारांचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचंही काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.