InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मला देशासाठी चौकीदार नको पंतप्रधान पाहिजे, हार्दिक पटेलचा मोदींना टोला

गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर हार्दिक पटेलने पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेद्र मोदींवर जोरदार टीका केली. मला चौकीदार नको पंतप्रधान पाहिजे. असा टोला हार्दिक पटेलने मोदींना लगावला आहे.

हार्दिक पटेल म्हणाले की, चौकीदार शोधायचा असेल तर मी नेपाळमध्ये जाईल. मला या देशात पंतप्रधान पाहिजे, जो या देशाच्या अर्थव्यवस्थेला, शिक्षणाला, युवकांना आणि सैनिकांना मजबुत करणारा पाहिजे. मला चौकीदार नको पंतप्रधान पाहिजे, अशी टीका हार्दिक पटेल यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.