InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रियांका गांधींनी मोदींच्या मतदार संघात केला भव्य रोड शो

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे काल भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले. प्रियांका गांधी यांनी यावेळी वाराणसीमधील अनेक मंदिरांना भेटी दिल्या.

वाराणसीमधून मोदींच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा माजी आमदार अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत देखील अजित राय यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.

वाराणसीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या रॅलीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. रॅली सुरू असताना भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एकीकडून ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या जात होत्या, तर भाजपचे कार्यकर्ते मोदी, मोदीच्या घोषणा देत होते. या गोंधळात एक कार्यकर्ता जखमी झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.