InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मोदी.. मोदी..’चा नारा देणाऱ्या लोकांना प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘ऑल द बेस्ट’

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्या. यावेळी प्रियांका गांधी यांनी चक्क गाडीतून उतरून घोषणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऑल द बेस्ट केले.

घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून, प्रियांका गांधींनी गाडी थांबवत, कार्यकर्त्यांची भेट घेतली. प्रियांका गांधींनी मोठ्या मनाने या सर्वांसोबत हसून हस्तांदोलन केलं आणि म्हटलं की, “तुम्ही तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी आहे. ऑल द बेस्ट.” त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी प्रियांक गांधी यांनाही ऑल द बेस्ट म्हटलं. हा सगळा मजेशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply