नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा वाद सोडवण्यासाठी काँग्रेसनेते शरद पवारांच्या दरबारी हजर

मुंबई : काही दिवसांपासून महाविकास आघाडीत बिघाडी झालाचं चित्र दिसतं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर राजकीय टीकाही करण्यात आली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाना पटोले यांच्याबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सोमवारी मध्यस्थी केल्याचीही माहिती समोर आली होती. आता एच.के. पाटील यांनी सोमवारी प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात राज्यातील प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय करून शरद पवार यांची भेट घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हजेरी नव्हती. त्यामुळे काँग्रेसचेच नेते नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातंय. एच. के. पाटील हे राहुल गांधी यांचे जवळीक मानले जातात.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा