‘….तर फडणवीसांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’; विजय वडेट्टीवार यांचा इशारा

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 40 हजार कोटी रुपये केंद्राकडे पाठवल्याचा दावा भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला. त्यानंतर या मुद्द्यावरुन फडणवीसांवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील फडणवीसांवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कर्जात असताना महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे केंद्रात पाठवले असतील तर त्यांना राज्यात फिरु देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी 40 हजार कोटी रुपये परत केंद्राकडे परत पाठवल्याचं विधान भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे. फडणवीस यांनी असं केलं असेल, तर ते महाराष्ट्रद्रोही काम आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे परत गेले असतील, तर महाराष्ट्र फडणवीस यांना माफ करणार नाही. त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.”

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.