कॉंग्रेसच्या नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं ; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

कॉंग्रेसच्या काही नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नव्हतं, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर नव्हतं, वकिलांमध्ये समन्वय नव्हता. कॉंग्रेसच्या काही नेत्यांना हे आरक्षण नको होतं. त्यांना मराठा आरक्षण म्हणजे कमीपणा वाटत होता, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

मराठा मोर्चांना खतपाणी घालणे हे आमचे कल्चर नाही. समाजात अस्वस्थता निर्माण व्हावी ही आमची इच्छा अजिबात नाही, मात्र ज्यांच्या मुलांना आरक्षणाअंतर्गत शैक्षणिक प्रवेश मिळाला नाही, ज्यांच्या नोकऱ्या अगदी मिळता-मिळता राहिल्या, त्यांच्यात आपसूकच अस्वस्थता निर्माण होईल. आता मराठा समाजाला सरकारने योग्य ती मदत करावी, यासाठी आम्ही आंदोलन करु, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा