काँग्रेस नेत्यांपाठोपाठ आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हा दिल्ली दौरा सद्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर अजूनही थोरात हे कायम आहेत. मात्र, नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडी बाबत अजूनही ठाम निर्णय झालेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत भेट घेतली आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय नाना पटोले यांच्याबरोबर राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यानंतर आताया या नेत्यांच्या पाठोपाठ भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी देखील पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. भेटीमुले अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दिल्लीतील ६ जनपथ या पवारांच्या निवासस्थानी या नेत्यांमध्ये सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ बैठक झाली आहे.

२५ जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या भेटी मागे या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडं, राज्यात ईडीच्या नोटिशींमुळे तापलेल्या राजकारणावर चर्चा झाल्याची शक्यता पुढे येत आहे. या आधी देखील शेलार-पवार यांच्या अचानक झालेल्या भेटी या चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.