InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘टोपीवाला आणि माकडे’ कथेसारखे काँग्रेसच्या नेत्यांचे राजीनामे – संजय राऊत

- Advertisement -

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांच्या या भूमीकेनंतर मध्य प्रदेशातील दिग्गज नेते आणि काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर काँग्रेसच्या राजीनामा नाट्याची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे.

संजय राऊत यांनी ‘टोपीवाला आणि माकडे’ या कथेचा आधार घेत काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि राहुल गांधी यांचे नाव न घेता टोला मारला आहे. ”टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर, सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकून दिली. याचा काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याशी काही संबंध नाही.” असा घुमजाव टोला  राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारला आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.