उद्धव ठाकरेंच्या हातात काँग्रेसच्या भाई जगतापांच्या आमदारकीचा फैसला; शिवसेना मदत करणार का ?

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यसभेतील पराभवानंतर आता विधान परिषदेसाठी आघाडीने कंबर कसली आहे. यादरम्यान या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी रणनीती ठरली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

अपक्षांना काही लोकांनी फोन केला, संख्या कमी पडत असल्याने अपक्षांना मदतीसाठी फोन केल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच इतर पक्षही हात झटकून कामाला लागले आहेत. मतांची जुळवाजुळव सुरु आहे. तसेच खरी लढत हि काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांना हरविण्यासाठी काँग्रेसचे भाई जगताप यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जगताप यांची शिवसेना नेतृत्वाकडून आशा वाढली आहे.

शिवसेनेकडे त्यांच्या २ उमेदवारांसाठी लागणारी किमान मत असून ३ मत अतिरीक्त आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना जगताप यांना मदत करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या अर्धा झडन अपक्ष आमदारांची मते मिळविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून शिवसेनेच्या बड्या नेत्यांची मनधरणी करण्यास जगताप यांनी सुरुवात केली आहे.

मात्र शिवसेनेने विरोधकांसोबतच मित्रपक्षांपासूनही थोडेसे फटकून राहण्याचा पवित्रा घेतलेल्या शिवसेनेने जगताप यांना वेठीस ठेवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जगताप यांच्यावर मेहरबान होणार का, हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा