InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

काँग्रेसच्या आमदारचा राजीनामा; बुधवारी करणार शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे  आज दिला.  यामुळे गावीत यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.  निर्मला गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश बुधवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर होणार आहे.

निर्मला गावित या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर  आमदार म्हणून निवडून आल्या  आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.दरम्यान, गावित यांनी  राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

Loading...

उद्धव ठाकरे यांनी गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश बुधवारी करू,  असे सांगितल्याचे समजते.   शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे   आज होणारे पक्ष प्रवेश रद्द करण्यात आले आहेत.गतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.