‘शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं हे योग्य नाही, काँग्रेस शिवसेनेवर नाराज’

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक काल लोकसभेच मंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 311 सदस्यांनी मतदान केले तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. विशेष म्हणजे विधेयकाला आधी विरोध करणाऱ्या शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान का केलं माहित नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याऐवजी अलिप्त राहू शकली असती. आम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होत. मात्र नंतर काय झालं माहित नाही. शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया हुसेन दलवाई यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.