InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महाराष्ट्रातून काँग्रेस भुईसपाट होण्याच्या मार्गावर; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची पिछेहाट

काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून भुईसपाट होताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसची मोठ्याप्रमाणावर पिछेहाट झाली आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला लोकसभेत ४४ जागा मिळाल्या होत्या. हा काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव मानला जात होता. यामुळे काँग्रेसला लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. यंदाच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

२०१४ सालच्या मोदी लाटेत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव विजय झाले होते. मात्र, यंदा शिवसेना आणि भाजपच्या जोरदार मुसंडीमुळे काँग्रेसला या दोन जागाही गमवाव्या लागू शकतात.

अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे नांदेडची जागा गमावणे ही काँग्रेससाठी मोठी नामुष्की ठरू शकते. तर हिंगोली मतदारसंघात यंदा राजीव सातव यांच्याऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार ते तब्बल २१ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण हेदेखील तब्बल १३ हजार मतांनी मागे पडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.