काँग्रेस पक्षाला राहूल गांधींच्या नेतृत्वाची गरज- जितेंद्र आव्हाड

लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे.आता वेळ आहे, तुम्ही नेतृत्व करा, सोडून जाऊ नका, पक्षाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे असे जितेंद्र आव्हाड या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत. आव्हाडांनी लिहिले की,‘तुमच्या राजीनाम्यामुळे, आणि त्यावर पुनर्विचार करण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसवर संकट ओढावले आहे. हे संकट पाहून मला त्रास होत होता.

तुमच्या राजीनाम्यामुळे, आणि त्यावर पुनर्विचार करण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसवर ओढवलेलं संकट पाहून मला त्रास होत होता. सोनिया गांधी वयोमान आणि प्रकृतीच्या कुरबुरी असूनही काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणू शकतील, यात तीळमात्र शंका नाही. मात्र आपण एक संवेदनशील नेते आहात. सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला तुम्ही नेटाने तोंड देऊ शकता. हा क्रौर्य तसंच विकासाचा मुखवटा पांघरलेली प्रवृत्ती आणि लोकांची खरी काळजी यामधील लढा आहे. त्यामुळे तुम्हाला कठीण काळात नेतृत्वाची परीक्षा पास करावीच लागेल’ असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.