नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.

“नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे. या विधेयकाचं समर्थन करणारे आपल्या देशाच्या जो पाया आहे त्याच्यावरच हल्ला करत आहेत,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.