डेटा चोरी: मोदींवर टीका करणारी कॉंग्रेस पुन्हा एकदा तोंडघशी

'प्ले स्टोअर' वरून कॉंग्रेसचे अॅप गायब

टीम महाराष्ट्र देशा- ‘नमोअॅप ‘च्या माध्यमातून भारतीयांचा डेटा अमेरिकेतील कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप करणारा कॉंग्रेस पक्ष चांगलाच तोंडघशी पडला आहे. पक्षाच्या अधिकृत अॅपमधून भारतीयांचा डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा आता फ्रान्सच्या हॅकरने केल्या नंतर काँग्रेसला स्वतःचंच अॅप प्ले स्टोअरवरुन डिलीट करावं लागलं आहे.

यांनी अशी केली होती टीका
‘माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर लॉग इन करता तेव्हा तुमची सर्व माहिती मी माझ्या अमेरिकन कंपनीतील मित्रांना देतो’, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.

काँग्रेसने केला. मात्र हा आरोप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत मोबाईल अॅप ‘नमो’च्या माध्यमातून भारतीयांचा डेटा अमेरिकेतील कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र हा आरोप केल्यानंतर काँग्रेस पक्ष स्वतःच अडचणीत आला आहे.

ज्या फ्रान्सच्या हॅकरच्या दाव्यावर काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. आज त्याच आज हॅकरने काँग्रेसच्या अॅपमधून डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा केला.हॅकरने आता काँग्रेस पक्षाचं अॅप असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या मोबाईल अपच्या माध्यमातून जेव्हा पक्षाच्या सदस्यतेसाठी अर्ज करता तेव्हा तुमची माहिती membership.inc.in ला जाते, असं हॅकरने म्हटलंय.membership.inc.in चा आयपी अॅड्रेस 52.77.237.47. सिंगापूरमधील आहे. तुम्ही एक भारतीय राजकीय पक्ष आहात. त्यामुळे तुमचं सर्व्हर भारतात असणं अधिक योग्य आहे, असा खोचक सल्लाही हॅकरने काँग्रेसला दिला.

भाजपला मिळाली टीकेची आयती संधी
हॅकरने भाजपला टीकेची आयती संधी दिल्यानंतर भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नमो अॅपवर आरोप करणाऱ्या काँग्रेसने स्वतःचंच अॅप प्ले स्टोअरवरुन डिलीट केलं, अशी माहिती मालवीय यांनी दिली. विशेष म्हणजे नमो अॅप डिलीट करण्यासाठी राहुल गांधी स्वतः आवाहन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.