InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आता ३० जानेवारीपर्यंत काँग्रेसने आघाडीबाबत अंतिम निर्णय घ्यावा – आंबेडकर

आघाडी करायची की नाही, याबाबत ३१ जानेवापीपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू, अशा इशारा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला आहे. ओवेसींच्या एमआय़एमला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघात मतभेद आहेत. आघाडी करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या काँग्रेससोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. काँग्रेस एमआयएमच्या मुद्यापलिकडे जायला तयार नाही.

आता ३० जानेवारीपर्यंत काँग्रेसने अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा ३१ जानेवारीला श्रीरामपूर येथे बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडीची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जुलै २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडीची घोषणा करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply