काँग्रेसने राहुल गांधींचे लग्न कधी होईल ते सांगावे

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

यानंतर भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केली जात आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तर यानंतर हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे काही नेते ही टेन्शन मध्ये येतील असं कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले होते.

यावरही भातखळकरांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांचे लग्न कधी होईल हे त्यांनी आधी सांगावे, असा उलट प्रश्नच त्यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.