InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…. त्याबद्दल नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल

मोदींना पाच वर्ष खोटं बोलून जनतेची फसवणूक केली, त्याबद्दल नरेंद्र मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या विनोद तावडे यांना प्रतिउत्तर देताना संचिन सावंत यांनी मोदींवर टीका केली.

सचिन सावंत म्हणाले की, नोटाबंदीच्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पाहत आहे. पन्नास दिवस द्या त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.