“काँग्रेस प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”

अकोला : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शिवसेनेच्या जवळ जात असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर वाढल्याचं चित्र आहे. यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

“धर्मनिरपेक्षतेच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहे. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नाही,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अकोल्यात नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

२०२४ मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं देखील नाना पटोले म्हणाले आहे.

दरम्यान, “संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो. तेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, तर आम्हाला भाजपकडून काहीच शिकण्याची कोणतीच गरज नाही,” असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा