काँग्रेसला गोव्यात ४० पैकी ४५ जागा मिळतील! महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा संताप
मुंबई : भाजपला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढाकार घेताना दिसत आहेत. मात्र संजय राऊत यांच्या एकत्र लढण्याच्या विचाराला काँग्रेसने धक्का दिला आहे. काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी करून गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे स्पष्ट होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपाला धूळ चारू शकतात, असा दावा संजय राऊत सातत्याने करत होते. मात्र काँग्रेस याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाही. यानंतर गोवा विधानसभा निवडणुकीवरूनच भाजप शिवसेनेवर टीका करत आहे तर शिवसेना भाजपवर. मात्र गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर संजय राऊत यांनी संतापून काँग्रेसला टोमणा मारला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसबद्दल संताप व्यक्त केला. काँग्रेसचे माहीत नाही, पण शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत. काँग्रेससोबत यावी म्हणून आम्ही प्रयत्न केला. पण त्यांना असे वाटते की त्यांना ४० पैकी ४५ जागा मिळतील! पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असे त्यांना वाटते. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षाला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? त्यांनी ४० पैकी ४५ जागा जिंकल्या तरी हरकत नाही, असं राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “आपल्या मतदारसंघातील रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार”; काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान
- ‘महाराष्ट्र सोडून फडवणीस गोव्यात व्यस्त असतील, तर विरोधी पक्ष नेत्याचा चार्ज कुणाकडे द्यायला हवा?’
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर सणसणीत टीका
- ‘स्वतःला संताजी-धनाजी म्हणून घेणाऱ्या प्रसाद लाड यांचे मुबंई बँकेतील पराभवाने मानसिक संतुलन बिघडले आहे का?’
- ‘प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी, सरकारही या जोडीला घाबरतं’