शिवसेना पाठोपाठ काँग्रेसलाही भीती; आमदारांना जयपूरला हलवणार

काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारी सुरु झाली आहे. मुंबईत काँग्रेस आमदारांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. आमदारांची फोडाफोडी होण्याची काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसकडून काळजी घेण्यात येत आहे. कर्नाटकात भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावले होते. हा अनुभव असल्याने काँग्रेसने सावधगिरी बाळगली आहे.

भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा तिढा सुटत नसल्याने आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती काँग्रेसलाही वाटू लागली आहे. भाजपने काँग्रेस आमदारांशी संपर्क सुरू केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व आमदारांना जयपूरला पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. आज या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. मुंबईतून त्यांची रवानगी थेट जयपूरला होणार आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने काँग्रेसनं आमदारांना जयपूरलाच पाठवण्याची तयारी सुरु केली आहे.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.