InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्नाटकात कुमारस्वामी यांचंच सरकार राहणार- काँग्रेस

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता वेगळेच वळण मिळाले आहे. काँग्रेसकडून शनिवारी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर काँग्रेस आशावादी असून राज्यात काँग्रेस- जेडीएस आघाडीचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच राहील असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. बंडखोर आमदार के.टी. एम. नागराज यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्य अधिक रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसने मनधरणी केल्यानंतर नागराज यांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले असून इतर बंडखोर आमदारांची समजूत घालणार असल्याचे सांगितले. इतर बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. आम्हाला आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असून राज्यातील कुमारस्वामी यांच्या सरकारला धोका नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, आमदारांची पळवापळवी होऊ नये, यासाठी जेडीएस. काँग्रेस आणि भाजपनेही पक्षाच्या आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply