“२०२४ च्या लोकसभा निवडणुका काँग्रेस जिंकणार”, पी. चिदम्बरम यांनी सांगितला फॉर्म्युला! म्हणाले…

मुंबई : सध्या देशात काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चाललीय. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरी जावं लागलं आहे. त्यानंतर सध्या काँग्रेसने विविध राज्यातील आपली सत्ता घालवली आहे. काँग्रेसमधून अनेक बड्या नेत्यांनी भाजपात पक्षांतर केलं आहे. या काळात काँग्रेसला अनेक छोटे मोठे धक्के सहन करावे लागले आहेत.

देशातील लोकसभा निवडणुकांना अजून तीन वर्ष बाकी असले, तरी आत्तापासूनच त्यासाठी आडाखे आणि डावपेच सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये वेगवेगळे बदल होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असं भाकीत केलं आहे.

पी.चिदंबरम यांनी बोलताना गोव्याच्या विधानसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीशी संदर्भ जोडला. आपण 2007 मध्ये गोवा विधानसभा निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक देखील जिंकलो, तसेच 2012 मध्ये गोव्यात हरलो आणि 2014 मध्ये आपण लोकसभा निवडणूक देखील हरलो. त्यामुळे यावेळी आपल्याला गोवा विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे, त्यामुळे आपण लोकसभा निवडणूक देखील जिंकू शकतो, असा विश्वास पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा