InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कुटुंबाच्याच स्वार्थामुळे आज काँग्रेसची दयनीय अवस्था – जावडेकर

पूर्वीची काँग्रेस ही देशाचा विचार करणारी होती. परंतु आताची काँग्रेस ही केवळ एकाच कुटुंबाचा विचार करणारी आहे. एका कुटुंबाच्याच स्वार्थामुळे आज काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

आता काँग्रेसची जिद्द संपली आहे. त्यांची राजकीय दृष्टी ही एका परिवाराच्या बाहेर जात नाही. त्यामुळेच त्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली होती. परंतु त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची सत्ता असलेल्याच राज्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे जावडेकर यावेळी म्हणाले. भारतीय मतदार हा सुजाण आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply