कोविडची वाढीती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील; अजित पवारांचे संकेत

मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशातच मुंबईत सध्या ५ हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आता वाढताना दिसत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही काही मार्गदर्शक सुचना केल्या आहेत.

यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आता लॉकडाऊन बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यास लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. राज्यातील कोरोना स्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा ही मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे.

तर आता नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवला आहे. मात्र, रोजची रुग्णसंख्या आणि वाढीचा दर लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील, असे सूतोवाच अजित पवारांनी दिले आहेत. कोरेगाव भिमा येथे अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी करोनाच्या स्थितीविषयी विचारणा केली असता अजित पवारांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या