InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘आमच्याबाबत षडयंत्र रचण्यात येतंय’; मिलिंद देवरा यांचा दावा

काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, असीम खान, सुरेश प्रभू, गणेश जाधव यांच्यासह आम्हाला आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्ही एका पंचतारांकित हॉटेलबाहेर शांतपणे थांबलो होतो. तेव्हा आम्हाला ताब्यात घेण्यात आले. आमच्याबाबत षड्यंत्र रचण्यात येत आहे, असे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सांगितले.

कर्नाटकमधील राजकीय संकट दिवसागणिक वाढत चालले आहे. बंडखोर आमदार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्‍यानंतर संकटात सापडलेल्‍या एचडी कुमारस्‍वामी सरकारला आणखी पेचात टाकण्यासाठी भाजपकडून आजपासून आंदोलन करण्याची भुमिका घेतली आहे. नाराज आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले कर्नाटकचे मंत्री डीके शिवकुमार यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. तसेच नसीम खान आणि खासदार मिलिंद देवरा यांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply