Constitution Day of India | भारतात संविधान दिवस कधीपासून आणि का साजरा केला जातो?, जाणून घ्या!
टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन (Constitution Day) म्हणून साजरा केला जात असला, तरी भारतामध्ये संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली होती. भारतीय संविधान ज्या दिवशी स्वीकारले त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर संविधानाची अंमलबजावणी ज्या दिवशी पासून झाली होती तो दिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानातील मूल्यांना मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो.
संविधानातील मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. आजच्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना शिकवली जाते. देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानातील मूल्यांची जाण असावी म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली.
भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेला तब्बल 167 दिवस लागले होते. यामध्ये जवळजवळ 11 सत्रे झाली होती. भारतीय राज्यघटनेच्या मूळ स्वरूपामध्ये 395 कलमे, 25 भाग आणि 8 अनुसूची आहेत. भारतीय संविधान हे संपूर्ण जगात सर्वात जास्त काळ स्वीकारलेले संविधान असून यामध्ये 1,44,000 शब्द आहेत. सध्या भारतीय संविधानामध्ये 470 कलम, 25 भाग आणि 12 अनुसूचीसह 5 परिशिष्ट आहेत.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे असे मानले जाते. यामध्ये भारताने अनेक देशांचे संविधान स्वीकारले आहेत. युके, युएसए, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपान या देशाच्या संविधानातून भारताने काही गोष्टी घेतल्या आहेत. भारतीय संविधानामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, सरकारची भूमिका इत्यादी गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत टाईप किंवा छापलेल्या नाही. तर प्रेम नारायण रायजादा यांनी ती हस्तलिखित केली आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये लिहिली गेलेली आहे. 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या संविधान सभेमध्ये उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केले होती.
महत्वाच्या बातम्या
- Baba Ramdev | “अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”; रामदेव बाबांचं वक्तव्य चर्चेत!
- Eknath Shinde | “आम्ही उघडपणे दर्शनाला जातो, काही लोकं…”; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला
- Yashomati Thakur | बाबा रामदेव यांच्या विधानावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “भगवा परिधान करून खालच्या दर्जाच वक्तव्य…”
- Amol Mitkari | “तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हाणूनी थोबाड फोडा”; रामदेव बाबांच्या विधानावर अमोल मिटकरी आक्रमक
- Skin Care Tips | पार्लरमध्ये न जाता ग्लोइंग स्किन हवी असेल तर, करा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती फॉलो
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.