InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘राम मंदिराचं बांधकाम २०२५ मध्ये सुरू’

राम मंदिराच्या निर्मितीसाठी अजुन थोडी वाट पाहावी लागेल. मंदिराचं काम २०२५ मध्ये सुरू होईल असं मत संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलंय. प्रयागराज इथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात विंश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने या कामात पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. जोंशींचं हे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी सरकारवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय.

भैय्याजी जोशी म्हणाले, ” २०२४ नंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल. राम मंदिराचं बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावं अशी कोट्यवधी हिंदूंची इच्छा आहे.” ते पुढं म्हणाले १९५२ मध्ये सोमनाथ मंदिराच्या बांधकामानंतर देशाने खूप प्रगती केली. राम मंदिराच्या निर्मितीनंतरही देश आणखी वेगाने प्रगती करेल.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.