InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महायुतीमध्ये रिपाइंलापण सत्तेचा वाटा; अविनाश महातेकर घेतील मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे.

भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठविली असल्याची माहिती ना रामदास आठवले दिली आहे.

महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा देण्यात येईल आणि मंत्रीमंडळात एक मंत्रिपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ना.  रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.